Homeमहाराष्ट्र मराठा आंदोलनावेळी तोडफोडप्रकरणी अटकसत्र सुरु...
मराठा आंदोलनावेळी तोडफोडप्रकरणी अटकसत्र सुरु…
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मराठा आंदोलनादरम्यान हिंसाचाराचा भडका उडाल्यानं शहरात मोठं नुकसान झालं होतं. तोडफोड, जाळपोळप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 5 हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विविध ठिकाणाहून 60 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून 20 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलं आहे. ही कारवाई नेमकी कशी आणि कुठे कुठे करण्यात आलीये ते पाहूया – औरंगाबादेतील […]
मराठा आंदोलनादरम्यान हिंसाचाराचा भडका उडाल्यानं शहरात मोठं नुकसान झालं होतं. तोडफोड, जाळपोळप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 5 हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
विविध ठिकाणाहून 60 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून 20 आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आलं आहे.
ही कारवाई नेमकी कशी आणि कुठे कुठे करण्यात आलीये ते पाहूया –
औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. याप्रकरणी ३० संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
शिवाय औरंगाबाद-जालना या रेल्वे मार्गावर ल्वे रोखल्याप्रकरणी सुमारे ४ हजार आंदोलकांवर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत.
परभणी जिल्ह्यात ४४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे तोडफोड आणि जाळपोळ केल्याची आहेत. तर रेल्वेवर दगडफेक करणाऱ्या ९ जणांवर रेल्वेने गुन्हे दाखल केले आहेत.
बीड जिल्ह्यात ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
लातूर जिल्ह्यात वाहनांवर दगडफेक आणि बसवर दगडफेक केल्याप्रकरणी २७ जणांवर गुन्हे दाखल कंर्यात आली आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच, तर भूम शहरात बसवर दगडफेकप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांत ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. शहरात आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार झाला होता.
जालन्यात २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्यावर उतरून तोडफोड, दगडफेक केल्याचे गुन्हे आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगावमध्ये जाळपोळ केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आहेत.