क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यातच भाजपा नेते आणि किरण गोसावी यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. मात्र, नवाब मलिकांचा दावा खोटा ठरला आहे. भाजप नेते निरंजन डावखरे यांनी मलिकांनी केलल्या आरोपाचा पर्दाफाश केला आहे.
भाजप नेते निरंजन डावखरे यांनी मलिकांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. डावखरे यांनी मलिकांनी केलेल्या आरपोचा पर्दाफाश केला असून, माहिती न मलिकांनी किरण गोसावी आणि माझ्यावर आरोप केल्याचे डावखरे म्हणाले. तसेच माझे व्यावसायिक संबंध असलेला किरण गोसावी ही स्वतंत्र व्यक्ती असल्याचे डावखरे म्हणाल आहेत.