पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचे प्रतिउत्तर, 3 दहशतवाद्यांना कंठस्थान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली गेल्यावर्षी पाकिस्तानी हद्दीत शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोमवारी रात्री भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन आणखी एक मोठी कारवाई केलीय. भारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. काश्मीरच्या केरी सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकच्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय […]

पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचे प्रतिउत्तर, 3 दहशतवाद्यांना कंठस्थान

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गेल्यावर्षी पाकिस्तानी हद्दीत शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर सोमवारी रात्री भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन आणखी एक मोठी कारवाई केलीय. भारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. काश्मीरच्या केरी सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकच्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले होते.

या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून यशस्वीपणे कारवाई केली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. येथून भारतीय जवानांनी पाकच्या रावळकोट सेक्टरमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. हे सैनिक ‘59’ बलूच रेजिमेंट’चे होते. याशिवाय, हल्ल्यात पाकिस्तानचे आणखी पाच जवानही जखमी झाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number