सीडीएस बिपीन रावत यांचे निधन

भारताचे सरंक्षणदलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे. वायुसेनेने त्यांच्या निधनाची पुष्ठी केली आहे. तामिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कुन्नरमध्ये लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि प्रमुख अधिकारी होते. या अपघातामध्ये सैन्यप्रमुख बिपिन रावत आणि त्यांची पत्नी जखमी […]

सीडीएस बिपीन रावत यांचे निधन

भारताचे सरंक्षणदलाचे प्रमुख सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचे तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले आहे. वायुसेनेने त्यांच्या निधनाची पुष्ठी केली आहे.

तामिळनाडूमधील उटी जिल्ह्यातील कुन्नरमध्ये लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे संरक्षणदलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि प्रमुख अधिकारी होते. या अपघातामध्ये सैन्यप्रमुख बिपिन रावत आणि त्यांची पत्नी जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांचे निधन झाले आहे.

तामिळनाडू येथे कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्य़े लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि अधिकारी असे १४ जण प्रवास करत होते. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचेही निधन झाले आहे. अपघातातील मृतदेहांची डीएनए टेस्ट केल्यानंतर ओळख पटवली जाणार आहे. या हेलिकॉप्टरचे पायलट विगं कमांडर पृथ्वी सिंह हे होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number