अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीकडून समस्यांकडे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोप

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 13 आणि 14 मधील नागरिक सध्या अत्यंत त्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे.

अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीकडून समस्यांकडे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोप

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 13 आणि 14 मधील नागरिक सध्या अत्यंत त्रस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना दररोज नगरपंचायतीत जाऊन पाणी मागावे लागते, तर काही वेळा नगराध्यक्षांच्या घरी जाऊन पाण्याची मागणी करावी लागते.

केवळ पाणीच नव्हे, तर रस्त्यांची दुरवस्था, तुटलेले नाल्यांचे चेंबर आणि त्यातून येणारी दुर्गंधी यामुळे परिसरात राहणे देखील कठीण झाले आहे. या समस्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई नगरपंचायतीकडून होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी स्पष्ट शब्दांत दिला आहे.  तसेच रस्ते व नाल्यांची दुरुस्ती झाली नाही तर सर्व नागरिक घरगुती पाण्याच्या घागरी घेऊन नगरपंचायतीसमोर आंदोलन करणार आहेत. या समस्येकडे नगरपंचायत प्रशासन लक्ष देणार का? आणि नागरिकांच्या त्रासाला न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : लोण्यातून साकारली हनुमानाची मूर्ती; जळगावच्या प्रसिद्ध अवचित हनुमान मंदिराची कथा

अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीकडून नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. वॉर्ड क्र. 13 आणि 14 मधील नागरिक पिण्याच्या पाणीसाठी त्रस्त आहेत. त्यामुळे जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा  नगरपंचायतीला दिला आहे. जर पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर घागरी घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.  

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number