शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदारकी अपात्र घोषित केली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मुदत संपल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे खोतकर यांचे आमदारपद न्यायालयानं रद्द ठरवलं 2014च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या […]

शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदारकी अपात्र घोषित केली आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मुदत संपल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे खोतकर यांचे आमदारपद न्यायालयानं रद्द ठरवलं

2014च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, असे याचिकेत नमूद करण्यात आलंय…. दरम्यान अर्जुन खोतकर यांना या निर्णयावर दाद मागण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

त्यामुळे अर्जुन खोतकर यांना विधानपरिषद निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही. एका महिन्याच्या काळात आमदार म्हणून त्यांना कुठेही मतदान करता येणार नाही, अशी अट खंडपीठाची आहे.  त्यामुळे जर एक महिन्यात विधान परिषद निवडणूक होत असेल तर त्यांना मतदान करता येणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number