जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
वस्त्रोद्योगमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिलीय. सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय.
2014च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याची तक्रार करण्यात आली होती. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठानं आमदारकीवर रद्द केली होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिलीय.