मिरजेत दोन गटात वाद, व्हिडीओ व्हायरल; समाजकंटकांना पोलिसांकडून बेड्या

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात वाद झाला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये व्हारल होत आहे. तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

मिरजेत दोन गटात वाद, व्हिडीओ व्हायरल; समाजकंटकांना पोलिसांकडून बेड्या

सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात वाद झाला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये व्हारल होत आहे. तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  

सांगलीतील मिरजेमध्ये मंगळवार पेठ परिसरातील माळी गल्ली येथे मिरजेत घर जागेच्या वहिवाटीच्या वादातून तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरज शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून काही जणांना ताब्यात घेतले आहे. माळी गल्ली येथे रहिवासी असलेल्या दोघांमध्ये घर जागा व वहिवाटीचा वाद सुरू आहे. या कारणातूनच त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. दोन गटात वाद सुरू असताना यापैकी एका गटातील तरुणांनी तलवार दाखवत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मोबाईलमध्ये चित्रित झाली आहे.

हेही वाचा : भारत न सोडणाऱ्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास?, पहलगाम हल्ल्यानंतर पाक नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश

तलवार दाखवत वाद सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी वादामध्ये तलवार दाखवत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number