राष्ट्रवादीत आता दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच पार्श्ववभूमीवर एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत बोलत असताना अजित पवारांनी शरद पवारांबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
एमईटीमध्ये बोलत असताना गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहात. आता ८० वर्षाचे झालात. त्यामुळे आता नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. आता तुमचे वय झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहे की नाही? असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे. भाजपसोबत जायचे नव्हते तर आम्हाला पाठवले का? मी खोटे बोलत नाही आणि खोटे बोलले तर पवारांची औलाद सांगणार नाही,असे म्हणत अजित पवारांनी मोठे गौप्यस्फोट केला. तर, २०१९ मध्ये भाजपसोबत पाच बैठका झाल्याचा खुलासा अजित पवारांनी केला आहे.