तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सोमवारी (२६ जून) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर सोलापूरला आले. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ६०० वाहनांच्या ताफ्यासह येथे पोहोचले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, त्यांनी आयोजित सभेत संबोधित केले.
काय म्हणाले के चंद्रशेखर राव ?
बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजीकय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु.