जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सैराट चित्रपटाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावी परेक्षेत पास झाली आहे. रिंकू 66.40 टक्के गुण मिळवून दहावी पास झाली झाली आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर आज राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. 91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51
आहे. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे.
कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे
विभागनिहाय निकाल
कोकण -96.18 टक्के
कोल्हापूर – 93.59 टक्के
पुणे – 91.95 टक्के
मुंबई – 90.09 टक्के
औरंगाबाद – 88.15 टक्के
नाशिक – 87.76 टक्के
लातूर – 85.22 टक्के
अमरावती – 84.35 टक्के
नागपूर – 83.67 टक्के