सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याबाबत मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेनं दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं स्वीकारला आहे.
काही अटीशर्तींसह कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. विशेष सीबीआय न्यायालयात पुढील सुनावणी ७ जूनला होणार आहे. ७ जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणी वाझे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.