ज्ञानवापी मशिदीमध्ये एएसआय सर्वेक्षणाला मान्यता

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराशेजारील असणारी ज्ञानवापी मशीद वादामध्ये आता न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी काय परिस्थिती उद्भवते हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे. तर दुसरीकडे हिंदू नागरिकांकडून ज्ञानवापी मशिदेतील नंदी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसच्या ASI सर्वेक्षणाची मागणी करणारी हिंदू बाजूची याचिका स्वीकारली आहे. यावर […]

ज्ञानवापी मशिदीमध्ये एएसआय सर्वेक्षणाला मान्यता

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराशेजारील असणारी ज्ञानवापी मशीद वादामध्ये आता न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी काय परिस्थिती उद्भवते हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे. तर दुसरीकडे हिंदू नागरिकांकडून ज्ञानवापी मशिदेतील नंदी काशी विश्वनाथ मंदिरामध्ये यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसच्या ASI सर्वेक्षणाची मागणी करणारी हिंदू बाजूची याचिका स्वीकारली आहे. यावर पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाला आक्षेप नोंदवण्यासाठी 19 मेपर्यंत मुदत दिली आहे. म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता चार फिर्यादी महिलांनी न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती.

यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ज्ञानवापी संकुलाचे ASI सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती. याचिका दाखल करण्यापूर्वी विष्णू जैन यांच्यासह 4 महिलांनी सकाळी काशी विश्वनाथ धामला भेट दिली. यापूर्वी शुक्रवारी अलाहाबाद न्यायालयाने कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.

याचिका स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना वकील विष्णू जैन म्हणाले की, ज्ञानवापी हे आदि विश्वेश्वराचे मंदिर असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. या प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिकदृष्ट्या कार्बन डेटिंग आणि जीपीआर सर्वेक्षणातूनच मिळू शकतात. आज दाखल याचिका याच प्रश्नांवर आधारित आहे. ज्ञानवापी मशिदीत पूर्वी मंदिर असल्याने त्या ठिकाणी मंदिरात नंदीची स्थापना व्हावी अशी वाराणसीतील नागरिकांची इच्छा आहे .

जेव्हा मंदिर पाडून त्यावर तीन घुमट बांधले गेले. या तीन कथित घुमटांचा इतिहास काय आहे? वादग्रस्त जागेच्या जमिनीखाली दडलेले सत्य काय? ज्ञानवापीच्या वाजूखान्यात सापडलेले कथित शिवलिंग स्वयंभू आहे की ते कुठूनतरी आणून येथे वसवले गेले आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात इथे काय परिस्थिती निर्माण होते हे बघणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number