जय महाराष्ट्र, मुंबई
फ्लिपकार्ट अॅपल वीकनंतर आता अमेझॉनने सुद्धा अॅपल फेस्ट सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये एक आठवड्यापर्यंत अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, घडाळ्यावर जबरदस्त सूट देण्यात आली आहे. या सेलची मुदत 12 मार्चपर्यंत असणार आहे.
अॅपलचा लेटेस्ट मॉडेल आयफोन X वर 8,000 रुपयांची सूट दिली आहे. 64 जीबीचा हा स्मार्टफोन 81,000 रुपयांना खरेदी करता येईल. 256 जीबीचा मॉडेल 93,999 रुपयांना खरेदी करता येईल. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 102,000 रुपये आहे. अमेझॉनच्या सेलमध्ये आयफोन 8 च्या 64 जीबी व्हेरिएंटवर 9000 रुपयांची सूट आहे. हा फोन 54,999 रुपयांत खरेदी करता येईल. 256 जीबीच्या स्मार्टफोनवर 7000 रुपयांची सूट देण्यात आली असून तो फोन 69,999 रुपयांना खरेदी करता येईल.
आयफोन 8 प्लस या स्मार्टफोनवर 10 टक्के सूट दिली आहे. याचा 64 जीबी व्हेरिएंट 65,999 रुपयांना खरेदी करता येईल. 256 जीबी मॉडेल 79,999 रुपयांना खरेदी करता येईल. या मॉडेलवर 16,257 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही आहे. आयफोन 7च्या 32 जीबी व्हेरिएंटवर 8000 रुपयांपर्यंत सूट आहे. त्यामुळे हा फोन 41,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
आयफोन 7 प्लसवर 3 टक्के सूट आहे. हा स्मार्टफोन 65,995 रुपयात खरेदी करता येईल. आयफोन SE याचा 32 जीबी व्हेरिएंट 17,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. आयफोन 6s वर 6000 रुपये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन 33,999 रुपयांना खरेदी करता येईल.