संशयित मानून ‘अॅपल’ कर्मचाऱ्याची लखनौ पोलिसांनी केली हत्या

उत्तर प्रदेशामध्ये पोलिसांचं ‘गुंडाराज’ सुरू असल्याचं आरोप होऊ लागला आहे. लखनौमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात गुन्हेगार नव्हे, तर ‘अॅपल’ कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाचा बळी गेला आहे. विवेक तिवारी असं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे.   विवेक तिवारी आपल्या एका महिला सहकाऱ्यासोबत गाडीमधून घरी जात असताना एका पोलीस हवालदाराने त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र विवेक यांनी गाडी […]

संशयित मानून ‘अॅपल’ कर्मचाऱ्याची लखनौ पोलिसांनी केली हत्या

उत्तर प्रदेशामध्ये पोलिसांचं ‘गुंडाराज’ सुरू असल्याचं आरोप होऊ लागला आहे. लखनौमध्ये पोलिसाने केलेल्या गोळीबारात गुन्हेगार नव्हे, तर ‘अॅपल’ कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकाचा बळी गेला आहे. विवेक तिवारी असं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे.

 

विवेक तिवारी आपल्या एका महिला सहकाऱ्यासोबत गाडीमधून घरी जात असताना एका पोलीस हवालदाराने त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र विवेक यांनी गाडी थांबवलीच नाही. या कारणामुळे संशयित समजून हवालदाराने थेट गाडीवर गोळीबार केला. यामध्ये विवेक यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. तसंच त्यांच्यासोबत असलेली महिला सहकारीही जखमी झाली आहे.

 

विवेक यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचे गंभीर पडसाद उत्तर प्रदेशात पडले आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणा अडचणीत आली आहे.

 

मात्र विवेक यांच्यावर गोळीबार केला, त्याने विवेक आणि महिला सहकाऱ्यावर आरोप केले आहेत. दोघेही कारमध्ये आक्षेपार्ह स्थितीत असल्याचं हवालदाराचं म्हणणं आहे. गाडी थांबवण्याचा इशारा देऊनही त्यांनी गाडी भरधाव वेगात पळवली. यामुळेच संशय बळावला आणि आपण संशयित समजून गाडीवर गोळीबार केल्याचं हवालदाराने स्पष्ट केलं. तसंच विवेक यांच्या गाडीने पोलिसांच्या बाइकला उडवलं असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. मात्र केवळ संशयित समजून एखाद्या व्यक्तीवर बळी घेण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला, असा प्रश्न उभा राहिला आहे.

 

विवेक यांच्या पत्नी कल्पना यांनी न्याय मिळेपर्यंत विवेक यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचीही मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number