मुंबई , १९ मे २०२३, प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेची सभा बीडमध्ये होणार आहे. तत्पूर्वी सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी शिवसेना नेते बीडमध्ये आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव व शिवसेना नेता सुषमा अंधारे यांच्यामध्ये वाद झाला यावेळी आपण सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा शिउबाठा जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी व्हीडीओतून केला आहे. त्यानंतर लगेच पक्षाने जाधव यांच्या सह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
‘सामना’मधून याची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केलाय. अंधारे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सध्या बीडमध्ये पोहोचली आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा केलाय.