अजित पवार यांच्याकडून दिलगिरी

विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यात आले होते. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी येथील कार्यक्रमात भाषणावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब’ या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून […]

अजित पवार यांच्याकडून दिलगिरी

विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यात आले होते. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी येथील कार्यक्रमात भाषणावेळी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब’ या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण ?

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, अजित पवार यांनी मी माझ्या भूमिकेवर ठाम असून माफी मागणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, पुणे येथील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार यांनी स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली आहे. आज सकाळीच भाजप नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चुकीच्या उल्लेख केल्याबद्दल जाहीर माफी मागितली होती.अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाल्यानंतर त्यांनी तात्काळ आपली चूक मान्य करत माफी मागितली. परंतु, विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.

वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या आता क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार असा सवाल उपस्थित करत आर्चार्य भोसले यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number