जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी अभय कुरुंदकरांची गाडी जप्त करण्यात आली आहे. तसंच कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 2 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीये.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता आहेत. याप्रकरणी ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि राजू पाटील अटकेत आहेत. कुरुंदकर यांची लाल रंगाची कार सांगलीतून जप्त करण्यात आलीये.
या गाडीतच कुरुंदकर यांनी अश्विनी बिद्रेंची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या कारमधून काही पुरावे मिळणार का, याकडे आता लक्ष लागलंय.