अनुष्काचा पहिला करवा चौथ ठरला विराटसाठी ‘लकी’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर या जोडप्याने शनिवारी त्यांचा पहिला करवा चौथ साजरा केला. शनिवारी भारत विरुद्ध विंडिजचा तिसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात जरी भारताला हार पत्करावी लागली असली तरी विराटसाठी मात्र हा दिवस खूप लकी होता. लग्नानंतर विरुष्काचा पहिला […]

अनुष्काचा पहिला करवा चौथ ठरला विराटसाठी ‘लकी’

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर या जोडप्याने शनिवारी त्यांचा पहिला करवा चौथ साजरा केला. शनिवारी भारत विरुद्ध विंडिजचा तिसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात जरी भारताला हार पत्करावी लागली असली तरी विराटसाठी मात्र हा दिवस खूप लकी होता.

लग्नानंतर विरुष्काचा पहिला करवा चौथ त्यांनी साजरा केला याचा फोटो अनुष्काने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यासोबत तिने पती विराटसाठी एक मेसेजही लिहीलाय.  ‘मेरा चांद, मेरा सूरज, मेरा तारा, मेरा सबकुछ’. यामध्ये अनुष्काने विराटच तिचा चंद्र आहे असं लिहिलं आहे.

अनुष्काने पती विराटसाठी करवा चौथचा व्रथ ठेवला होता त्याचं फळ विराटला क्रिकेट मैदानात मिळालं. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडिजच्या एकदिवसीय मालिकेत विराटने तीन सामन्यात शानदार शतक ठोकून एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. शतकांची हॅट्‌ट्रिक साधणारा विराट हा भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटचं वनडे कारकीर्दीतील हे ३८वं शतक ठरलं.

करवा चौथ हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. या मध्ये पत्नी आपल्या पतीसाठी उपवास करते, आणि संध्याकाळी चंद्राची आणि पतीची पूजा करून आपला उपवास सोडते. यावेळी दिवसभर उपाशी असलेल्या पत्नीला पती काही तरी गिफ्ट देतो. क्रिकेटचा सामना असल्याने विराटला अनुष्कासाठी काही गिफ्ट घेणं काही जमलं नाही. मात्र, त्याच्या मैदानातील कामगीरी पाहून अनुष्काला तीचं गिफ्ट नक्की मिळालं असेल. अनुष्कानं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती तर विराटनं काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number