वृत्तसंस्था, मुंबई
अनुष्का शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा रोवला जाणार आहे. दादासाहेब फाळके या प्रतिष्ठित पुरस्काराने अनुष्काचा गौरव करण्यात येणार आहे . अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल अनुष्काला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.वयाच्या २५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असतानाच तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलय.

‘एनएच १०’नंतर ‘फिलौरी’ आणि ‘परी’ या दोन चित्रपटांची निर्मिती तिने केली. बॉक्स ऑफीसवर या दोन चित्रपटांना फारशी दाद मिळाली नसली तरी, अनुष्काने हा प्रवास थांबवला नाही.अनुष्का आणि कर्नेशने त्यांच्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून नव्या प्रतिभांना संधी दिली. दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ असा विविध क्षेत्रात नव्या लोकांना कामाची संधी दिली. एकंदरीत तिच्या या कामगिरीची दखल घेत दादासाहेब फाळके या पुरस्काराने तिला गौरविण्यात येणार आहे.