अनुपम खेर यांचे सतीश कौशिक यांच्या मुलीला वचन

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांची मुले सिनेविश्वात पदार्पण करत असतात. यामुळे अभिनयाचा वारसा सुरु ठेवण्यासाठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या घरातील कुणी ना कुणी या क्षेत्रात पदार्पण करत असतेच. अशातच अभिनेते अनुपम खेर यांनी दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका कौशिक सोबतचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केला आहे. अभिनेते […]

अनुपम खेर यांचे सतीश कौशिक यांच्या मुलीला वचन

मुंबई, २२ जून २०२३, प्रतिनिधी : सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांची मुले सिनेविश्वात पदार्पण करत असतात. यामुळे अभिनयाचा वारसा सुरु ठेवण्यासाठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या घरातील कुणी ना कुणी या क्षेत्रात पदार्पण करत असतेच. अशातच अभिनेते अनुपम खेर यांनी दिवंगत चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका कौशिक सोबतचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केला आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी सामायिक केलेल्या व्हिडिओत ते वंशिका खेर हिच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. व्हिडिओत अनुपम वंशिकाला विचारतात की,”तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे?” यावर ती म्हणते, “मला माहित नाही” तर पुढे अनुपम म्हणाले की, “जर तुला कधी अभिनेत्री व्हायचं असेल तर ते तिला अभिनयाचं प्रशिक्षण तर देतीलच, पण त्यासोबत ते तिला लाँचही करतील. दरम्यान, तिला तिच्या वडिलांबद्दल काय आठवते हेही तिने या व्हिडिओत सांगितले.

अनुपम खेर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर सामायिक केलेल्या हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. काहींनी याबद्दल त्यांचे कौतुक केले तर काहींनी त्यांना ट्रोल केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number