जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला ‘हाय-लक्झरीयस’ असे ‘अनुभूती’ कोचेस जोडण्यात येणार आहेत.
अत्यंत आधुनिक आरामदायी असे अनुभूती कोचेस चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) तयार करण्यात आलेत.
शताद्बीतील एसी फर्स्ट क्लास एक्झुकेटीव्ह चेअरकार कोचेसना अनुभूतीचे हे अत्याधुनिक कोचेस जोडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानातून प्रवास केल्यासारखा आरामदायी अनुभव मिळणार आहे.