आज पाटणा येथे विरोधकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला १६ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. ही बैठक तब्बल ४ तास चालली. विशेष म्हणजे या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला १००च्या पेक्षा जास्त जागा जिंकू न देण्याचा निर्धार विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी केला.
आगामी रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची पुढच्या महिन्यात शिमला येथे बैठक होणार आहे. या बैठकीत प्रत्येक राज्यासाठी काय रणनीती असावी, यावर चर्चा केली जाणार आहे. बिहारची राजधानी पाटण्यात आज विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. देशभरातील १५ शक्तीशाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज पाटण्यात बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली आहे.
सर्व पक्षांनी आगामी काळात एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ही बैठक बोलावल्याबद्दल आभार मानले. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तसेच पुढच्या बैठकीत हीच चर्चा पुढे नेण्याबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढची बैठक शिमला येथे जुलै महिन्याच्या ५ ते १० तारखेच्या दरम्यान होईल, असं सांगितलं आहे.
सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. इथे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, असे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते, असे नितीश कुमार यांनी सांगितले.“एकत्र चालण्याच्या मुद्द्यावर संमिती झालीय. सर्व पक्षांची पुन्हा एक बैठक बोलावण्यात आलीय. सर्वांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या बैठकीचं नियोजन मल्लिकार्जुन खर्गे करतील. कोण कुठे लढतील याबाबत निर्णय होतील. सर्वांनी देशाच्या हिताचा निर्णय घेतलाय. सध्याचं सरकार देशाच्या हिताच्या विरोधात काम करत आहे. आम्ही सर्व एकत्र येण्याचं ठरवलं आहे, असे नितीश कुमार म्हणाले.