समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होण्याचं नाव नाही. आज समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ हा अपघात झाला आहे. महामार्गावरून ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे. तारेने भरलेला हा ट्रक नागपूरवरून मुंबईकडे जात असताना सकाळी 6 वाजता अमरावती […]

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कमी होण्याचं नाव नाही. आज समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजनाजवळ हा अपघात झाला आहे. महामार्गावरून ट्रक थेट पुलावरुन खाली कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी आहे.

तारेने भरलेला हा ट्रक नागपूरवरून मुंबईकडे जात असताना सकाळी 6 वाजता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेदुरजना खुर्द दरम्यान हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट समृध्दी महामार्गाच्या पुलावरून 15 फूट खाली असलेल्या रस्त्यावर कोसळला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर वाहक गंभीर जखमी झाला.

आशिष तिवारी असे मयत चालकाचे नाव आहे, तर संतोष केवट असे गंभीर जखमी वाहकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तातडीने त्यांना धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number