मणिपुरात पुन्हा भडका !

मणिपुरात, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या २४ तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी ४ ऑगस्ट रात्री मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे. […]

मणिपुरात पुन्हा भडका !

मणिपुरात, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या २४ तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यात शुक्रवारी ४ ऑगस्ट रात्री मेईतेई समुदायाच्या तीन लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर समुदायाच्या काही लोकांनी अनेक घरांना आग लावली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. एवढंच नाही तर जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलीस चौकीत हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला.

जमावानं २३५ असॉल्ट रायफल, २१ सब-मशीन गन, १६ पिस्तूल, ९,००० गोळ्या आणि १२४ हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. दरम्यान, ३ ऑगस्ट रोजी कुकी गट, इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम ने हिंसाचारात बळी पडलेल्या ३५ जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे.

मणिपूरमध्ये ३ मे २०२३ पासून मेईतेई आणि कुकी समुदायांमधील जातीय हिंसाचारामुळं आतापर्यंत १५० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, ५० हजारांहून अधिक लोकांना छावणीत राहण्यास आणि राज्य सोडण्यास भाग पाडलं जात आहे. अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत.c

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number