मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे प्रेम प्रकरण सुरु असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहेत. अशातच ते दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याची बातमी समोर आली. दरम्यान आता परिणीती पती राघव चड्ढासोबत आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ते दोघे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
It’s in public now♥️
MP Raghav Chadha & Actress Parineeti Chopra spotted watching IPL 2023 game in Mohali….@raghav_chadha @ParineetiChopra pic.twitter.com/g02knMx4Su — Meena Joshi (@MeenaJoshi_) May 3, 2023
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप चे नेते राघव चढ्ढा हे विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर अशातच राघव आणि परिणिती हे आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पाहिल्यावर चाहत्यांनी ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
हा घोषणाबाजीचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे.