ज्या सणाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते तो सण म्हणजेच गणेशोसत्सव आता अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, पहिली तयारी सुरु होते ती कोकणातल्या चाकरमान्यांची गणेशोत्सवापूर्वीच दोन महिन्यांआधी सर्व कोकणकर कोकण रेल्वेची तिकीट कन्फर्म करण्यासाठी चाकरमन्यांची धावपळ सुरु होते. दरम्यान यंदा देखील कोकण रेल्वेचे बुकींग फुल झाल्याने सगळ्यांचे लक्ष गणपती स्पेशल ट्रेनकडे लागले होते.
अशातच कोकण रेल्वेने 246 गणपती विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली असून यामध्ये 184 आरक्षित आणि 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्या असणार आहे. या गाड्यांच्या सीएसएमटी, एलटीटी, पुणे आणि दिवा येथून विशेष फेऱ्या धावणार असून त्या सावंतवाडी रोड, रत्नागिरी, मडगाव, खेड आणि चिपळूणसाठी सेवा देणार आहे. या घोषणेने आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 246 गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. गणपती स्पेशल आरक्षित विशेष गाड्यांचे बुकिंग 1 ऑगस्ट 2026 पासून सूरू होणार आहे. आयआरसीटीसी आणि सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तिकिटे उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे, तर, 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश आहे.
या रेल्वेगाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 98 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 76 फेऱ्या, पुणे येथून 10 फेऱ्या आणि दिवा येथून 62 फेऱ्या अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यावेळी सीएसएमटी-सावंतवाडी रोड सीएसएमटी दैनंदिन विशेष रेल्वेच्या 32 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्र. 01103 ही 11 ते 26 सप्टेंबर या कालावधीत दररोज सीएसएमटी येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
'वंदे भारत'ला तांत्रिक बिघाडाचा फटका
अत्याधुनिक आणि वेगवान सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायर बिघाडाचा फटका बसला. गाडी क्रमांक 20706 मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी दुपारी कसारा-इगतपुरी घाट विभागात ओएचई इन्सुलेटरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सुमारे 30 मिनिटे खोळंबली.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक
1 ऑगस्ट – गाडी क्र. 01153, 01445, 01167. 01447
2 ऑगस्ट- गाडी क्र. 01165, 011८5
3 ऑगस्ट- गाडी क्र. 01103, 0112९, 01151, 01171, 01131
कोणत्या मार्गावर किती विशेष गाड्या?
सीएसएमटी – सावंतवाडी रोड : 66 फेऱ्या
सीएसएमटी – रत्नागिरी : 32 फेऱ्या
एलटीटी – सावंतवाडी रोड : 46 फेऱ्या
एलटीटी – रत्नागिरी : 22 फेऱ्या
एलटीटी – मडगाव : 8 फेऱ्या
पुणे – रत्नागिरी : 10 फेऱ्या
दिवा – खेड (मेमू) : 32 फेऱ्या
दिवा – चिपळूण (मेमू) : 30 फेऱ्या