अण्णांचं उपोषण स्थगित…गिरीष महाजनांच्या शिष्टाईला यश…

सरकारनं दिलेल्या उत्तरावर अण्णा काही अंशी समाधानी आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आलंय. अण्णा हजारे यांची आज गिरीश महाजन यांनी भेट घेतली. तसंच अण्णांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारचं पत्रही त्यांनी अण्णांना सादर केलं. त्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना केली होती. पण लोकपाल नियुक्तीचं आश्वासन केंद्र सरकारनं पाळलं […]

अण्णांचं उपोषण स्थगित…गिरीष महाजनांच्या शिष्टाईला यश…

सरकारनं दिलेल्या उत्तरावर अण्णा काही अंशी समाधानी आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आलंय. अण्णा हजारे यांची आज गिरीश महाजन यांनी भेट घेतली. तसंच अण्णांच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्र आणि राज्य सरकारचं पत्रही त्यांनी अण्णांना सादर केलं. त्यानंतर अण्णांनी उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना केली होती. पण लोकपाल नियुक्तीचं आश्वासन केंद्र सरकारनं पाळलं नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 

आता सरकारनं 8 सदस्यांची समिती नेमल्यानं लोकपाल नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्यात लोकायुक्त नेमा, सुक्ष्म सिंचनावरचा जीएसटी 4 टक्के करा, कृषी मुल्य आयोगाला स्वायतत्ता द्या.दूधासाठी खर्चावर आधारीत हमीभाव द्या अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number