जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या मार्चमध्ये दिल्लीत आंदोलन करणारयेत. हे शेवटचं आंदोलन असल्याची घोषणा अण्णांनी केलीये.
या आंदोलनातील मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर प्राणाची आहुती देईन. असा इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय.
येत्या 23 मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आव्हान करतानाच तुरुंगात जाण्याची तयारी असेल तर दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, अशी हाकही त्यांनी दिलीये.