जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
लोकपाल लोक आयुक्त आणि स्वामिनाथन आयोग लागू करावा या मागणीसाठी अण्णा हजारे 23 मार्चला दिल्लीच्या रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत.
त्यासाठी बुधवारी अण्णा हजारे राळेगण सिध्दी येथून गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत.
मंगळवारी नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजनांनी यासंबंधित भेट घेतल्यानंतरही अण्णा हजारे मात्र, आपल्या निर्णयावर मात्र ठाम आहेत.