Ahilyanagar NEET Student : ‘माझ्यासाठी खूप त्याग केलात, आता कसला त्रास घेऊ नका’, महाराष्ट्रात नीटचा आणखी एक बळी; चिठ्ठी पाहून डोळे पाणावले

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अंकिता सांगळे हिने टोकाचं पाऊल उचललं आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात जाऊन तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Ahilyanagar NEET Student : ‘माझ्यासाठी खूप त्याग केलात, आता कसला त्रास घेऊ नका’, महाराष्ट्रात नीटचा आणखी एक बळी; चिठ्ठी पाहून डोळे पाणावले

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अंकिता सांगळे हिने टोकाचं पाऊल उचललं आहे. नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात जाऊन तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या पेपरफुटी आणि पुढे येणारी पुन्हा परीक्षा यांचा तणाव तसेच कमी गुण मिळाल्याचे नैराश्य सहन न झाल्याने अंकिताने आत्महत्येचा पर्याय निवडला. 

अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील 18 वर्षीय अंकिता सांगळे असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून तिने नीटचा पेपरही दिला होता. यापूर्वी देखील तिने नीटचा पेपर दिला होता, मात्र तेव्हा ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर पेपर लीक झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने पुन्हा एकदा नीटचा पेपर दिला. मात्र यावेळेस कट ऑफ 177 असताना तिला 166 गुण मिळाले. ज्यामुळे तिच्या ॲडमिशनमध्ये अडचणी येत होत्या. याच नैराश्यात जाऊन तिने राहत्या घरी घरी गळफास लावून आत्महत्या केली, यासंदर्भात तिने चिठ्ठी लिहत कुटुंबीयांना माहिती दिली.

हेही वाचा- Dharashiv Crime : "पैसे परत दे, नाहीतर…" अल्पवयीन मुलाचं अपहरण करत आईला फोनवरून धमकी; धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार

यावेळी तिने चिठ्ठीत लिहलं होत की, "तुम्ही मला इतकं प्रेम दिलं, एवढा जीव लावला, पण मी तुमची एकही इच्छा पूर्ण करू शकली नाही. मम्मी तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण बनून मला साथ दिली. दादा तू पण मला खूप साथ दिली. मम्मी पप्पांपेक्षा तू जास्त जीव लावला. माझ्या जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत. तुम्ही जे सुख दिलंय, ते मी कधीच विसरू शकत नाही. दादा तू मम्मी-पप्पांची काळजी घे, त्यांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नको. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मी तुम्हाला कुठला आनंद देऊ शकले नाही. मी आधी जेव्हा नीटचा अभ्यास करत होती, त्यावेळी तुम्ही त्याग केलात आणि मी काय केलं, तुमची इच्छा मी पूर्ण करु शकले नाही. आता कसला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आनंदी राहा,तुमची अंकिता"

या घटनेची दखल अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी देखील घेतली आहे. त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. मात्र अंकिताच्या आत्महतेमुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number