अनिल परब यांचं ईडीला पत्र

शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी ईडीला पत्र लिहिले आहे. ईडीने चौकशीला बोलवले असताना. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अनिल परब गैरहजर राहिले होते.अनिल परब यांनी ईडीला पत्र लिहून तारीख वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे.मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावला आहे. सध्या अनिल परब हे ईडी च्या रडारवर आहेत. विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असताना आता […]

अनिल परब यांचं ईडीला पत्र

शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी ईडीला पत्र लिहिले आहे. ईडीने चौकशीला बोलवले असताना. काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अनिल परब गैरहजर राहिले होते.अनिल परब यांनी ईडीला पत्र लिहून तारीख वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे.मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावला आहे. सध्या अनिल परब हे ईडी च्या रडारवर आहेत. विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असताना आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या मागे ईडीची पिडा लागली आहे . ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते .

मनी लॉड्रिंग प्रकरणी अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहे. ईडीने याआधी परब यांची चौकशी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावण्यात आला आहे. परब यांना पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आले होते . याआधी एकदा अनिल परब ईडी कार्यालयात चौकशीला आले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परब चौकशीला गैरहजर राहिले आहेत.

मुंबईत पोहचल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार आहेत . आहे असे त्यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना सांगितले होते. आज आलेल्या माहिती नुसार अनिल परब यांनी ईडी ला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ईडी कडे तारीख वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अनिल परब यांना चौकशीला जाता आले नाही असे त्यांनी सांगितले. दापोली रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली होती.तर, ईडीने एकदा त्यांच्या शासकीय निवासस्थानी चौकशी केली होती.

मागील महिन्यात २६ मे रोजी अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. तसंच अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यासोबतच वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी आणि दापोलीतही ईडीकडून छापे टाकले होते.१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू होती. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे ५० कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number