जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिलीय.
शिवसेना आमदार अनिल परब यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कोकण भवन येथे कोकण उपायुक्त यांची भेट घेतलीय. यावेळी मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत मनसेने काही आक्षेप घेतला असेल तर कोकण आयुक्त याबाबत निर्णय घेतील असे मत शिवसेना आमदार अनिल परब यांनी व्यक्त केलंय.