जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरकार करत असलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर शिवसेना लक्ष ठेवून असल्याचं आमदार अनिल परब यांनी सांगितलं.
सरकारनं पहिल्या टप्पात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. यावर बोलताना, ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे.
सरकारने पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीय. आता पुढील टप्प्यात कर्जमाफी होणाराय. यावर शिवसेना लक्ष ठेवून आहे’, असं परब यांनी सांगितलं.
कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.