अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई, ५ जुलै २०२३, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांला मारहाण केल्याप्रकरणात सत्र न्यायालयाने मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्व आरोपींनी तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर […]

अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई, ५ जुलै २०२३, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांला मारहाण केल्याप्रकरणात सत्र न्यायालयाने मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह सहा जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्व आरोपींनी तपासात पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने याप्रकरणी अटकेत असलेले परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांनाही जामीन मंजूर केला. तसेच अनिल परब यांच्यासह स्नेहा साटम, दीपक गुटकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वाईंगणकर आणि हरी शास्त्री यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

२२ जून २०२३ रोजी वांद्रे पूर्व येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेला बेकायदा ठरवून पालिका अधिकाऱ्यांनी ती शाखा पाडली होती. त्यानंतर त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर शाखा ही ४४ वर्षे जुनी असल्याची माहिती तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या घटनेनंतर सोमवारी अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विविध नागरी समस्यांबाबत एच-पूर्व महापालिका वॉर्डवर मोर्चा काढला. यावेळी अनिल परब यांनी भाषण देखील केले. या भाषणानंतर त्यांनी अनिल परब यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळामध्ये आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शाखेचे पाडकाम केलेल्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता असलेले अजय पाटील वय वर्ष ४२ यांनी त्यांना मारहाण केल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी वाकोला पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्ररीनंतर पोलिसांनी अनिल परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध पालिका अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यामुळे याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number