अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; ईडी कोठडीत वाढ

  खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सत्र न्यायालयाने घेतला आहे.  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले […]

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; ईडी कोठडीत वाढ

  खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सत्र न्यायालयाने घेतला आहे.

 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यानंतर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख न्यायालयात हजर झाले. त्यामुळे त्यांची १३ तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. न्यायालयाने देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती.

 आज अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली असून आणखी तीन दिवस देशमुखांना कोठडीत काढावे लागणार आहेत. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुखांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number