अनिल देशमुख जे.जे. रुग्णालयात दाखल

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारागृहात चालताना पडल्याने अनिल देशमुखांच्या खांद्याला मार लागला. त्यामुळे खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच त्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण ? […]

अनिल देशमुख जे.जे. रुग्णालयात दाखल

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारागृहात चालताना पडल्याने अनिल देशमुखांच्या खांद्याला मार लागला. त्यामुळे खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच त्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण ?

१०० कोटी रुपये वसुलीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. तसेच अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे देशमुखांच्या कोठडीत वाढ झाली आहे.

अनिल देशमुख, सचिन वाझे, कुंदन शिंदे यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे दिला आहे. मात्र, आता अनिल देशमुखांना खांदेदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे  चौकशीसाठी सीबीआय अधिकाऱ्यांना वाट पहावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने कारागृहात यांची चौकशी केली होती. मात्र, त्यांनी योग्य सहकार्य केले नाही. तसेच आता पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number