अनिल बोंडे यांच्या विजयाचे बॅनर झळकले

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आलाय. यात अमरावतीचे अनिल बोंडे ४८ मतांनी विजयी झालेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी बोंडे यांच्या विजयाचे बॅनर झडकलेत. यावर बोडे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड विश्वास आहे २०१९ मध्ये हरून देखील त्यांनी कोणतेही कामात कमतरता ठेवली नाही. हा विजय त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या […]

अनिल बोंडे यांच्या विजयाचे बॅनर झळकले

राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल हाती आलाय. यात अमरावतीचे अनिल बोंडे ४८ मतांनी विजयी झालेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ठिकठिकाणी बोंडे यांच्या विजयाचे बॅनर झडकलेत. यावर बोडे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड विश्वास आहे २०१९ मध्ये हरून देखील त्यांनी कोणतेही कामात कमतरता ठेवली नाही.

हा विजय त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा असल्याचा विश्वास वसुधा बोंडे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अनिल बोंडे यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अमरावतीच्या किसान मोर्चाकडून अभिनंदन, अशा आशयाचा बॅनर भाजप नेते नरेंद्र राऊत यांनी लावला आहे. या बॅनवर भाजपच्या दहा कार्यकर्त्यांचे फोटोही लावण्यात आले आहेत.

विजयानंतर अनिल बोंडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस नेहमी बोलतात हे सरकार कधी पडेल याचा काही मुहुर्त सांगु शकत नाही. हे सरकार आपआपसातील कलहाने पडेल. जनतेला हे सरकार डोईजड झाले आहे. आमदार विटलेले आहेत.देवेंद्र फडणीवस आणि चंद्रकांत पाटील यांनी सद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. किती दिवस अपक्ष आमदार आणि लहान पक्ष सहन करणार असेही अनिल बोंडे म्हणाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number