‘श्रीं’च्या दर्शनासाठी सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई आज अंगारकी संकष्टी चतुर्थी, आजच्या दिवशी सर्व गणेश भक्त उपवास करून श्री गणपती बाप्पाची भक्ती भावाने पूजा – अर्चना करतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त अगदी रात्री पासूनच श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय, यामुळे श्री सिद्धिविनायक गणपती न्यास समितीकडून विशेष व्यवस्था केल्याचं पाहायला मिळतय. श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी […]

‘श्रीं’च्या दर्शनासाठी सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी, आजच्या दिवशी सर्व गणेश भक्त उपवास करून श्री गणपती बाप्पाची भक्ती भावाने पूजा – अर्चना करतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त अगदी रात्री पासूनच श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळतेय, यामुळे श्री सिद्धिविनायक गणपती न्यास समितीकडून विशेष व्यवस्था केल्याचं पाहायला मिळतय.

श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आलीय, त्याचप्रमाणे आज मंदिरात पुजाविधीचे आयोजनही करण्यात आले आहे. या पुजाविधीसाठी सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांधेकरही मंदिरात उपस्थित आहेत. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त आज सिद्धिविनायक मंदिरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number