विद्यार्थी रस्त्यावर, शिक्षण वाऱ्यावर?

भविष्याचा पाया रचला जातो. हिंगोली जिल्ह्यातील पुयनी खुर्दया या गावी मात्र आंगणवाडीपासूनच विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली आहे. अगदी ही लहान मुलं रस्त्यावर आली आहेत. पुयनी खुर्दया गावातील आंगणवाडीमध्ये काही दिवसांपूर्वी साप निघाला होता. यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही घबराट पसरली. या घटनेमुळे मुलांना आंगणवाडीमध्ये शिकवण्याऐवजी आंगणवाडीच्या बाहेर रस्त्यावर बसवून शिकवण्यास सुरुवात केली गेली. पण विद्यार्थ्यांची परवड […]

विद्यार्थी रस्त्यावर, शिक्षण वाऱ्यावर?

भविष्याचा पाया रचला जातो. हिंगोली जिल्ह्यातील पुयनी खुर्दया या गावी मात्र आंगणवाडीपासूनच विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली आहे. अगदी ही लहान मुलं रस्त्यावर आली आहेत.

पुयनी खुर्दया गावातील आंगणवाडीमध्ये काही दिवसांपूर्वी साप निघाला होता. यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही घबराट पसरली. या घटनेमुळे मुलांना आंगणवाडीमध्ये शिकवण्याऐवजी आंगणवाडीच्या बाहेर रस्त्यावर बसवून शिकवण्यास सुरुवात केली गेली. पण विद्यार्थ्यांची परवड एवढ्यावरच थांबली नाही.

गावातील अंतर्गत वाद आणि राजकारण याचा फटका निरागस बालकांना बसला आहे. या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांकडे ग्रामस्थांचं दुर्लक्ष झालं असून सध्या येथील लहानग्यांना बसला बसलाय. अंगणवाडी मदतनीस तसंच सेविकांवर आता या विद्यार्थ्यांना थेट रस्त्यावर बसून शिकवायची वेळ आली आहे.

या प्रकरणी संबंधित घटनेची प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. तरीही अद्याप प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई केली गेली नसल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे प्रत्येक मुला-मुलीने शाळेत जावं, तेथे त्यांना योग्य शिक्षण मिळावं यासाठी योजना राबवण्यात येतात. मात्र अशावेळी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना चक्क रस्त्यावर बसून शिकावे लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number