अंगणवाडी सेविकांचा संप मागे,मानधनात 5 टक्के वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांची बैठक संपली आणि हा निर्णय जाहीर केला. आता सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळणार आहे.  मार्च 2018 पासून सेविकांच्या  मानधनात 5 टक्के वाढ होणार आहे. ११ सप्टेंबरपासून राज्यातील ९७ हजार अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी बेमुदत संप […]

अंगणवाडी सेविकांचा संप मागे,मानधनात 5 टक्के वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांची बैठक संपली आणि हा निर्णय जाहीर केला. आता सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळणार आहे.  मार्च 2018 पासून सेविकांच्या  मानधनात 5 टक्के वाढ होणार आहे.

११ सप्टेंबरपासून राज्यातील ९७ हजार अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसाठी बेमुदत संप पुकारला होता. अंगणवाडी सेविकांना अनेक राज्यांमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक मानधन देण्यात येते. महाराष्ट्रात मात्र त्या आठ हजार रुपये मानधन देण्याची मागणी करत होत्या.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेने या अंगणवाडी सेविकांना पाठिंबा जाहीर केला होता. तर शिवसेनेसह आता काँग्रेसनंही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number