‘आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा कोरोनाचे नियम पाळून होणार’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी आणि कुणकेश्वर येथील प्रसिद्ध यात्रा कोरोनाचे नियम पाळून संपन्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी कुडाळमध्ये एक बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी तर कुणकेश्वर यात्रा १ मार्च रोजी संपन्न होणार आहे. ही यात्रा […]

‘आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रा कोरोनाचे नियम पाळून होणार’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी आणि कुणकेश्वर येथील प्रसिद्ध यात्रा कोरोनाचे नियम पाळून संपन्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी कुडाळमध्ये एक बैठक पार पडली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी तर कुणकेश्वर यात्रा १ मार्च रोजी संपन्न होणार आहे. ही यात्रा कोरोनाचे नियम पाळून पार पडणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. उदय सामंत म्हणाले, भाविकांना मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. अर्थातच, कोरोनाचे सर्व नियम पाळून यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच आंगणे कुटुंबीयांसमवेत कुडाळ येथे बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number