आंध्र प्रदेशच्या विजयवाडातील कृष्णा नदीत बोट बुडून 14 जणांना जलसमाधी
वृत्तसंस्था, आंध्र प्रदेश विजयवाडा येथील कृष्णा नदीत एक बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडलीय. बोट बुडाल्यानं 14 जणांना जलसमाधी मिळालीय. तर, 16 ते 20 जणांना वाचवण्यात यश आलंय. अद्याप नदीत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे विजयवाडा परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होते.