आनंद परांजपे यांची पुन्हा शहराध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यनंतर ठाणे शहर अध्यक्ष आनंद परंजपे यांची जितेंद्र आव्हाडांनी शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. मात्र अजित पवारांनी परांजपे यांची पुन्हा शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांना प्रदेश प्रवक्ते पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आनंद परंजपे यांची हकालपट्टी झाल्यानंतर २४ तासांच्या आत परांजपे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. सोमवारी (दि.३ जुलै) ठाण्यात आव्हाडांनी […]

आनंद परांजपे यांची पुन्हा शहराध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाट्यनंतर ठाणे शहर अध्यक्ष आनंद परंजपे यांची जितेंद्र आव्हाडांनी शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. मात्र अजित पवारांनी परांजपे यांची पुन्हा शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांना प्रदेश प्रवक्ते पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आनंद परंजपे यांची हकालपट्टी झाल्यानंतर २४ तासांच्या आत परांजपे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. सोमवारी (दि.३ जुलै) ठाण्यात आव्हाडांनी नियुक्त केलेल्या नवीन शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी कार्यभार स्वीकारला होता. यामुळे आता आनंद परंजपे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांचे एके काळचे खास आसणारे विरोधी पक्षनेते राहिलेले नजीब मुल्लाही अजित पवारांसोबत आसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, आनंद परांजपे यांच्यासोबत फोटो मध्ये तेही दिसत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number