‘आनंद दिघेंची हत्या झाली’

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. “आजही ठाण्यातील प्रत्येक घरात आनंद दिघे यांना दैवत मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे […]

‘आनंद दिघेंची हत्या झाली’

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. “आजही ठाण्यातील प्रत्येक घरात आनंद दिघे यांना दैवत मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी ठाण्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनातील इच्छा आहे.”, असंही शिरसाटनी म्हटलं आहे.

आनंद दिघेंचा अपघात झाला नसून त्यांचा खून झाला होता. एका दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. पण एक दिवस आधीच अचानक असं काय घडलं ज्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला, यामागचं सत्य समोर आलं पाहिजे, अशी मागणीही शिरसाट यांनी यावेळी केली. शिरसाट म्हणाले की, शिंदेंसाहेबांकडे माझी मागणी ही असेल की, प्रत्येक लोकांच्या मनामध्ये आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघेंच्या झालेल्या मृत्यूची चौकशी केली पाहिजे. आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत अनेकांच्या मनात शंका. अनेकांचे मत आहे की, त्यांचा अपघात नसून त्यांचा खून झालेला आहे.

आजही ठाणेकरांच्या मनात आनंद दिघे यांची आठवण आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आनंद दिघेंचे कट्टर शिवसैनिक आहे म्हणून दिघे यांचा आश्रम सुसज्ज असा केलेला आहे. जे दिघे साहेबांच्या अंत्यविधीला नव्हते, ते देखील आज त्या आश्रमात जाऊन डोकं टेकवतात. प्रॉपर्टी बळकावणं हा तुमचा धंदा असेल, अशी टीकाही शिरसाटांनी केली आहे. संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणात त्यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे, यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आता संजय शिरसाट यांच्या या मागणी मान्य होते की नाही? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number