Pune Crime : धक्कादायक! दोन सख्ख्या बहिणींवर 60 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार; बळजबरीने घरी नेले अन्…

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.

Pune Crime : धक्कादायक! दोन सख्ख्या बहिणींवर 60 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार; बळजबरीने घरी नेले अन्…

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षाच्या नराधमाकडून 10 आणि 5 वर्षाच्या दोन सख्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला मोठ्या बहिणीला बळजबरीने घरात नेऊन तिच्या अत्याचार केला, त्यानंतर लहान बहिणीला देखील तशाच प्रकारे घरी नेऊन तिच्यावर देखील अत्याचार केली. दरम्यान पीडित मुली पैकी एका मुलीच्या पोटात वारंवार दुखू लागल्या नंतर तिच्या कुटुंबियांना ही धक्कादायक घटना कळाली आहे. 

हेही वाचा- Ulhasnagar Crime: दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध; आईनेच आवळला मुलीचा गळा, वडिलांची पोलिसांकडे धाव

या प्रकरणात पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल रात्री वाकड पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वाकड पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, बालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number