Jalgaon Fire News : जळगावात कोळसा मालगाडीच्या बोगीत अचानक उसळल्या ज्वाळा; मोठी दुर्घटना टळली

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली.

Jalgaon Fire News : जळगावात कोळसा मालगाडीच्या बोगीत अचानक उसळल्या ज्वाळा; मोठी दुर्घटना टळली

जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला आग लागल्याची घटना घडली. शिवाजीनगर रेल्वे पुल परिसरात ही घटना घडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

भुसावळकडून येणाऱ्या कोळसा मालवाहू रेल्वेच्या पाचव्या बोगीमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले.

कोळशामधील उष्णता किंवा घर्षणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून रेल्वे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. हि घटना शिवाजीनगर रेल्वे पुल परिसरात घडल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number