Bhiwandi Gas Cylinder Tempo Accident : भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा ऐरणीवर! खड्ड्याचा अंदाज न आल्याने गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो पलटी

भिवंडी शहरातील नागाव परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे.

Bhiwandi Gas Cylinder Tempo Accident : भिवंडीतील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा ऐरणीवर! खड्ड्याचा अंदाज न आल्याने गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो पलटी

भिवंडी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. भिवंडी शहरातील नागाव परिसरात रस्त्यावरील मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. 

या अपघातामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने टेम्पो चालकासह अन्य कोणालाही दुखापत झाली नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून गाडी खड्ड्यात आपटल्याने सिलेंडर रस्त्यावर पडले. 

हेही वाचा- Maharashtra Housing Society: मोठी बातमी! सोसायटीच्या मेंटेनन्सवर राज्य सरकारचा मोठा निर्णय; लाखो फ्लॅटधारकांवर होणार थेट परिणाम

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सर्व खाली सिलेंडर टेम्पो भरले व टेम्पोला सरळ करून हा टेम्पो पुन्हा गोदामच्या दिशेने निघाला आहे. या घटनेमुळे भिवंडीतील खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक भागांत मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. 

विशेषतः अवजड वाहनांसाठी हे रस्ते अधिक धोकादायक ठरत असून, अशा अपघातांची पुनरावृत्ती होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number