Pune Crime : हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव, पण प्रियकराच्या मदतीने तिने आपल्याच मुलाला… शिरुरमधली धक्कादायक घटना

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका आईने आपल्याच 6 वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

Pune Crime : हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव, पण प्रियकराच्या मदतीने तिने आपल्याच मुलाला… शिरुरमधली धक्कादायक घटना

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका आईने आपल्याच 6 वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मुलाची बाथरूममध्ये निर्दयी हत्या करण्यात आली. ही घटना 4 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कुरुळी, ता. खेड येथील एका भाड्याच्या खोलीत घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बसरीन शेख आणि राम कजेवाड हे दोघेही गेल्या काही कालावधीपासून प्रेमसंबंधात होते. बसरीन शेख हिचा 6 वर्षाचा मुलगा आवेज हा त्यांच्या प्रेमात अडथळा असल्याचं त्या दोघांना जनवत होत. त्यामुळे दोघांनी 6 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव घेण्याचा प्लॅन केला. 4 एप्रिल रोजी रात्री त्याला बाथरूममध्ये नेऊन त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून आणि भिंतीवर आपटून त्याला ठार मारले.

हेही वाचा- Sambhajinagar Crime : भरदिवसा पेट्रोल पंपावर थरार, आधी वाद नंतर काही वेळातच प्रेयसी रक्ताच्या थारोळ्यात

त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेऊन हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र नातेवाईकांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी महिलेला अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल असून दुसरा आरोपी फरार आहे. अवेज मेहबूब शेख असे मृत मुलाचे नाव आहे. तर बसरीन मेहबुब शेख असं त्या निर्दयी आईचं नाव आहे. ती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number