Budget Session : राज्याच्या विकासाचा तिहेरी अजेंडा! AI, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्जमाफीवर विशेष भर; अर्थसंकल्पात काय असणार?

सह्याद्री अतिथी गृह कॅबिनेट हॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

Budget Session : राज्याच्या विकासाचा तिहेरी अजेंडा! AI, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्जमाफीवर विशेष भर; अर्थसंकल्पात काय असणार?

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्ताधारी व विरोधी पक्षांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यानंतर सह्याद्री अतिथी गृह कॅबिनेट हॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी महायुती सरकारकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अजितदादांनी आर्थिक शिस्त कधीही मोडली नाही, त्यांचे कार्य पुढे नेऊ असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे अजितदादांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी काम करू असं उममुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसेच निवडणुकांदरम्यान ज्या घोषणा केल्या त्या आता पूर्ण करण्यासाठी कामाला लागू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. दरम्यान या बैठकीत विविध धोरणात्मक निर्णयांवर चर्चा झाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number